मुंबई पोलिस दलात सत्तांतरानंतर फेरबदल? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई पोलिस दलात 
सत्तांतरानंतर फेरबदल?
मुंबई पोलिस दलात सत्तांतरानंतर फेरबदल?

मुंबई पोलिस दलात सत्तांतरानंतर फेरबदल?

sakal_logo
By

मुंबई, ता. १२ : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महत्त्वाच्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे वारे वाहू लागले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर राज्य पोलिस दलात मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे मलईदार पोस्टिंग मिळवण्यासाठी अनेक अधिकारी सध्या नेत्यांचे उंबरठे झिजवताना दिसत आहेत. सध्या मुंबई पोलिस दलामध्ये १२ उपायुक्त तसेच दोन सहायक पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या प्रलंबित आहे. या पदांचा अतिरिक्त पदभार उपायुक्त तसेच सहआयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे.
राज्याची सूत्रे एकनाथ शिंदे यांनी हाती घेतल्यानंतर मुंबई पोलिस दलात मोठ्या प्रमाणात फेरबदल होणार असल्याची चर्चाही रंगू लागली आहे. काही महिन्यांपूर्वी मुंबईसह राज्यातील पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बदली आणि बढत्यांचे आदेश काढण्यात आले होते; मात्र याबाबतचे पत्रक काढल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये पाच अधिकाऱ्यांच्या बदलीच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली होती. विशेष म्हणजे मुंबई आणि ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे हे आदेश मागे घेण्यात आले होते. अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून महाविकास आघाडीतील नेत्यांमधील मतभेद समोर आले होते. त्यातच आता सत्तांतरानंतर मत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर पोलिस दलात अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असल्याची चर्चा रंगली आहे.
----------
सरकार बदलले तरी उच्चपदस्थ पोलिस अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली होत नाही. महाराष्ट्र पोलिस दलात तसा पायंडा नाही.
- धनराज वंजारी, माजी पोलिस अधिकारी
--------
अनेक राज्यात सरकार बदलल्यानंतर पोलिस दलातही आमूलाग्र बदल होतात; पण शक्यतो उच्चपदस्थ अधिकारी सहसा बदलत नाहीत.
- पी. के. जैन, माजी आयपीएस अधिकारी

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88771 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..