कांदा बटाटा लिलावगृहाची कमान कोसळली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कांदा बटाटा लिलावगृहाची कमान कोसळली
कांदा बटाटा लिलावगृहाची कमान कोसळली

कांदा बटाटा लिलावगृहाची कमान कोसळली

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. १२ (वार्ताहर) : एपीएमसीतील कांदा बटाटा मार्केटमधील लिलावगृहाच्या छताची लोखंडी कमान कोसळल्याची घटना मंगळवारी (ता. १२) सकाळी घडली आहे. लोखंडी कमान वाहनावर कोसळल्याने कुठलीही दुर्घटना घडली नाही. मात्र, या घटनेमुळे कांदा बटाटा मार्केटमधील धोकादायक झालेल्या लिलावगृहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

वाशी येथील एपीएमसीतील कांदा बटाटा मार्केटमध्ये शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तसेच व्यापाऱ्यांसाठी लिलावगृह उभारण्यात आले आहे. या लिलावगृहात दररोज मोठ्या प्रमाणात खरेदी विक्रीचे व्यवहार होत असतात. मंगळवारी सकाळी लिलवगृहात वाहनातील शेतमाल उतरवण्यासाठी वाहन उभे असताना येथील लोखंडी कमान अचानक खाली कोसळली. ही कमान थेट वाहनावर कोसळली. या घटनेनंतर एपीएमसी प्रशासनाने लोखंडी कमान कोसळलेला भाग सील केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88792 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top