कन्नडमधील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांकडून पाच लाखांची मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कन्नडमधील मृतांच्या नातेवाईकांना  मुख्यमंत्र्यांकडून पाच लाखांची मदत
कन्नडमधील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांकडून पाच लाखांची मदत

कन्नडमधील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांकडून पाच लाखांची मदत

sakal_logo
By

मुंबई, ता. १२ ः औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील नावडी गावात विजेचे जोडकाम करताना घडलेल्या दुर्घटनेत चार कंत्राटी मजुरांचा मृत्यू झाला होता. या घटनेची तातडीने दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करावा, असे आदेशही त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

कन्नड तालुक्यातील नावडी येथे विजेच्या जोडणीचे काम करत असताना अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने विजेच्या झटक्याने या मजुरांचा जागच्या जागी मृत्यू झाला होता. जगदीश मुरकुंडे, भारत वरकड, अर्जुन मगर, गणेश थेटे अशी या मजुरांची नावे आहेत. ५० हजारांची तातडीने मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरनारे यांना फोन करून दिले. तसेच शासकीय मदतदेखील लवकरच देण्यात येईल असेही स्पष्ट केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88793 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top