ठाण्यातील जुन्या तलावांना नवी झळाळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यातील जुन्या तलावांना नवी झळाळी
ठाण्यातील जुन्या तलावांना नवी झळाळी

ठाण्यातील जुन्या तलावांना नवी झळाळी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ ः ठाणे शहरातील उपवन, कासारवडवली आणि मोघरपाडा येथील जुन्या तलावांना नवी झळाळी मिळणार आहे. या तलावांना नवसंजिवनी देत त्यांच्या सुशोभीकरणासाठी राज्य सरकारकडून पाच कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून बनारस घाटाच्या धर्तीवर तलावांवर घाटांचे बांधकाम करून त्या ठिकाणी संगीत कारंजे (म्युझिकल फाऊंटन) बसवण्यात येणार आहेत. याशिवाय नागरिकांना फिरण्यासाठी, मॉर्निंग वॉकसाठी ट्रॅकही बांधण्यात येणार आहेत.
ठाण्यातील उपवन तलावाजवळ बनारस घाटाच्या धर्तीवर उपवन घाट बनवण्यात आला असून, तेथे अनेक धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम वर्षभरात होतात. तेथे संस्कृती युवा प्रतिष्ठानकडून दरवर्षी होणाऱ्या ‘उपवन आर्ट फेस्टिवल’ला लाखो नागरिकांचा प्रतिसाद मिळतो. त्यामुळे कासारवडवली व मोघरपाडा या दोन मोठ्या तलावांवर ‘उपवन घाटाप्रमाणे बनारस घाटा’च्या धर्तीवर घाट बांधले जावे, अशी आमदार प्रताप सरनाईक यांची संकल्पना होती. त्यानुसार श्री गणेशोत्सव, नवरात्र उत्सव, छटपूजा यासह हिंदू धर्मातील सर्व उत्सव करण्यासाठी लोक तलावाजवळ जमत असल्याने येथे चांगला घाट बांधण्यात येणार आहे.
तलावात म्युझिकल फाऊंटन लावले जाणार असून, त्यावर लाईट इफेक्ट्स देण्यात येणार आहेत. तलावांचे सुशोभीकरण करण्याचे संकल्पचित्र तयार आहे. तसेच ‘म्युझिकल फाऊंटन’ बसवून तेथे संगीत कारंज्याचे म्हणजेच म्युझिकल फाऊंटनचे दररोज सायंकाळी ‘शो’ ठेवले जाणार आहेत. जे पाहण्यासाठी परिसरातील नागरिक आणि पर्यटकही येऊ शकतील व त्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल, अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. या कामासाठी राज्य सरकारने पाच कोटी इतका निधी वर्ग केल्याने ठाणे महापालिकेने आता पुढील निविदा प्रक्रिया करून याच वर्षात लवकरात लवकर कामाला सुरुवात करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

खर्चाचा सर्व भार राज्य सरकारकडे
कासारवडवली व मोघरपाडा येथील तलावांवर ‘बनारस घाटा’च्या धर्तीवर घाटांचे बांधकाम करण्यासाठी प्रत्येकी १० कोटी व उपवन, कासारवडवली व मोघरपाडा या तीन तलावांमध्ये संगीत कारंजे (म्युझिकल फाऊंटन) बसवण्यासाठी पाच कोटी असे एकूण २५ कोटी राज्य सरकारकडून मंजूर करण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी प्रयत्न केले होते. त्यापैकी पहिल्या टप्यात राज्य सरकारने पाच कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी-सुविधांचा विकास या योजनेंतर्गत हा निधी देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकल्प खर्चाचा १०० टक्के हिस्सा राज्य सरकारचा राहणार असल्याने राज्य सरकारच्या निधीतून हे काम होणार असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88828 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..