
शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटकपदी समिधा मोहिते
ठाणे, ता. १३ : गेली अनेक वर्षे शिवसेनेत कार्यरत असलेल्या समिधा मोहिते यांची निवड पक्षाने ठाणे जिल्हा महिला संघटकपदी केली आहे. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे चौदावे वंशज सुरेश मोहिते यांच्या त्या पत्नी आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर संपूर्ण राज्याच्या राजकारणाचे समीकरण बदलले आहे. त्यात ठाण्यात शिंदे गटाला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा पूर्ण पाठिंबा मिळत असल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्याची नव्याने मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना ठाणे, पालघर जिल्हा महिला संघटक मिनाक्षी शिंदे यांची हकालपट्टी केल्यानंतर ज्येष्ठ शिवसैनिक अनिता बिर्जे यांना पुन्हा संधी देण्यात आली. त्यानंतर त्यांचे हात आणखी मजबूत करण्यासाठी समिधा मोहिते यांचीही निवड करण्यात आली आहे. मूळ सातारा जिल्ह्यातील तळबीड गावातील समिधा मोहिते ठाण्यात स्थायिक झाल्या असून, ओवळा माजिवाडा मतदारसंघात त्यांचे मोठ्या प्रमाणात काम आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88833 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..