पैसे हिसकावून पळालेल्या चोराला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पैसे हिसकावून पळालेल्या चोराला अटक
पैसे हिसकावून पळालेल्या चोराला अटक

पैसे हिसकावून पळालेल्या चोराला अटक

sakal_logo
By

मानखुर्द, ता. १३ (बातमीदार) ः मानखुर्दच्या महाराष्ट्रनगर परिसरात स्वयंपाकाचे सिलिंडर वितरण करणाऱ्या चालकाच्या हातातून रोकड हिसकावून पळालेल्या आरोपीला ट्रॉम्बे पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली. रशीद शेख (वय २५) असे त्याचे नाव आहे. त्याने अफाक मुस्ताक (वय २२) यांना मारहाण करून त्यांच्या हातातील रोकड हिस्कावली होती. अफाक यांनी दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदवण्यात आला होता.
अफाक या चालकाने मंगळवारी (ता. १२) दुपारी तीनच्या सुमारास स्वयंपाकाचे सिलिंडर महाराष्ट्रनगर येथे पोहोचवून त्या बदल्यात १० हजार रुपये रोकड घेतली होती. ही रक्कम मोजत असताना त्या ठिकाणी रशीद हा रिक्षा घेऊन आला व वाहन नीट चालवता येत नाही का, असा जाब विचारत अफाक यांच्याशी वाद घालू लागला. वाद घालत असतानाच त्याने बांबूने त्यांना मारहाण करून जखमी केले व त्यांच्या हातातील रक्कम हिसकावली. त्यानंतर रिक्षातून पळ काढला. या मारहाणीत जखमी झालेले अफाक तत्काळ रुग्णालयात गेले व उपचार करून ट्रॉम्बे पोलिस ठाणे गाठत त्यांनी तक्रार नोंदवली. उपनिरीक्षक शरद नानेकर यांच्या पथकाने आरोपीचा शोध घेतला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88852 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top