सोमटा येथे अतीवृष्टीमुळे घर कोसळले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोमटा येथे अतीवृष्टीमुळे घर कोसळले
सोमटा येथे अतीवृष्टीमुळे घर कोसळले

सोमटा येथे अतीवृष्टीमुळे घर कोसळले

sakal_logo
By

कासा, ता. १३ (बातमीदार) ः पालघर जिल्हातील सोमटा गावातील परशुराम हाडळ या शेतकऱ्याचे राहते घर अतिवृष्टीमुळे कोसळले. अनेक दिवसापांसून पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून जनजीवन विस्कळित झाले आहे.
गुरुवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास सोमटा येथील रहिवासी परशुराम हाडळ हे आपल्या सहा जणांच्या कुटुंबासह झोपले होते. त्या वेळी घराची भिंत पडण्याचा आवाज आला. तेव्हा लगेचच सर्व कुटुंब घराबाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु घरातील सर्व अन्नधान्य, कपडेलत्ते सामानाचे मोठे नुकसान झाले आहे. जोरदार पाऊस सरू असल्याने सामान्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88866 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top