
मुसळधार पाऊसामुळे जनजीवन विस्कळीत
मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित
विक्रमगड, ता. १३ (बातमीदार) : विक्रमगड तालुक्यात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस पडत असल्याने नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. बुधवारी दिवसभर मुसळधार पाऊस झाल्याने विक्रमगड तहसीलमध्ये २०४.५ मी.मि. पावसाची नोंद करण्यात आली आहे. भातशेती पाण्याने भरली असल्याने पावसाचा जोर असाच राहिला तर भात रोपे कुजण्याची भीती शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. तालुक्यातील अनेक नद्यांना, नाल्यांना पूर आल्याने काही गावांचा संपर्क काही काळ तुटला होता.
बुधवारी सकाळी शिळ-देहर्जे व कुंर्झे-ब्राह्मणगाव मार्गावरील देहर्जे नदीवरील पुलावरून पाणी वाहू लागल्याने या मार्गावरील संपर्क काही काळ तुटला होता. तसेच विक्रमगड तालुक्यातील काही छोटे पूल काही वेळ पाण्याखाली गेले होते. त्यामुळे वाहतूक काही काळ खोळंबली होती. बुधवारी दिवसभर पावसाचा जोर कायम असल्याने जनजीवन विस्कळित झाले होते.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88878 Txt Palghar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..