गार्डच्या चुकीचा एसी लोकल फटका! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गार्डच्या चुकीचा एसी लोकल फटका!
गार्डच्या चुकीचा एसी लोकल फटका!

गार्डच्या चुकीचा एसी लोकल फटका!

sakal_logo
By

मुंबई, ता. १३ : वातानुकूलित लोकलचे स्वयंचलित दरवाजे न उघडल्याने मंगळवारी दादरऐवजी प्रवाशांना भायखळा स्थानकावर उतरण्याची वेळ आली. ही घटना तांत्रिक अडचणीमुळे नव्हे, तर रेल्वे गार्डने चुकीचे बट दाबल्यामुळे झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने या गार्डला तातडीने प्रशिक्षणाला पाठवले आहे.
कल्याण-सीएसएमटी ही वातानुकूलित लोकल मंगळवारी दादर स्थानकात सकाळी ७.१४ वाजता पोहोचली; मात्र या लोकलचे स्वयंचलित दरवाजे उघडले गेले नाहीत. ३० सेकंदांनंतर ही लोकल भायखळ्याला रवाना झाली; परिणामी दादर स्थानकात उतरणाऱ्या प्रवाशांना भायखळा स्थानकात उतरावे लागले होते.
----
नको ते बटन दाबले!
वातानुकूलित लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची सुरुवातीला चर्चा होती; मात्र रेल्वे प्रशासनाच्या चौकशीत गार्डच्या चुकीमुळे हा प्रकार झाल्याचे पुढे आले. दादर स्थानकात लोकल आल्यानंतर गार्डला दरवाजे उघडण्याचे बटन दाबायचे होते; मात्र गार्डकडून चुकीने दार बंद करण्याचे बटन दाबले गेल्याने लोकलचे दरवाजे बंदच राहिले.
---
उपाययोजना सुरू
याप्रकरणी वातानुकूलित लोकलच्या गार्डला तात्काळ प्रशिक्षणाकरिता पाठवण्यात आले आहे. सध्या मुंबईत वातानुकूलित लोकलच्या ४४ फेऱ्या धावत आहेत. आठवड्यातून एक किंवा दोन वेळा गार्डची या लोकलवर ड्युटी लावली जाते. त्यामुळे त्यांना यंत्रणा हाताळण्याची सवय नसल्याने अशी घटना घडते. या घटना पुन्हा घडू नयेत म्हणून आता मध्य रेल्वे उपाययोजनांच्या कामाला लागली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88880 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top