झेडपीच्या २७ शाळांवर तिसऱ्या डोळ्याची नजर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

झेडपीच्या २७ शाळांवर तिसऱ्या डोळ्याची नजर
झेडपीच्या २७ शाळांवर तिसऱ्या डोळ्याची नजर

झेडपीच्या २७ शाळांवर तिसऱ्या डोळ्याची नजर

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ठाणे जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळा या महामार्ग अथवा मुख्य रस्त्यांच्या कडेला आहे. त्यात या रस्त्यांवरून वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच विद्यार्थ्यांची सुरक्षा अबधित राहण्‍यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून झेडपीच्या शाळांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये जिल्हा परिषदेच्या २७ शाळांचा समावेश असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर तिसऱ्या डोळ्याची नजर असणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दुर्गम व आदिवासी पाड्यांवर जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. त्यातील बहुतांश शाळा ह्या रस्त्याच्या कडेला आहेत. त्यामुळे शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी शाळेबाहेर पडत असताना, एखाद्या वाहनामुळे अपघात घडण्याची शक्‍यता असते. तसेच अनेक शाळांना संरक्षक भिंती बांधण्यात आलेल्या नाहीत. काही शाळा पत्र्यांच्या खोल्यांमध्ये भरतात. तसेच अनेक शाळांच्या आवारातून बालके चोरीला जाण्याच्या घटना घडत असल्याची उदाहरणे आहेत. यामुळेच शाळांच्या आवारात घडणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसावा, यासाठी प्रत्येक शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ होणार आहे. याची दखल घेत, ठाणे जिल्हा परिषद प्रशासनानेदेखील झेडपीच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा महत्त्‍वपूर्ण निर्णय घेतला आहे.
५० लाखांची तरतूद
तत्कालीन ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या २७ शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेण्‍यात आला. यासाठी ५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा अबाधित राहण्यास मदत होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88887 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..