पावसाचा कहर सुरूच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसाचा कहर सुरूच
पावसाचा कहर सुरूच

पावसाचा कहर सुरूच

sakal_logo
By

बोर्डी, ता. १३ (बातमीदार) ः डहाणू तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टी आणि पूर्व भागाला लागून असलेल्या गावांमध्ये पावसाचा कहर सुरूच आहे. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले आहे. शेतीच्या कामातही व्यत्यय येत आहे.
मागच्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने मंगळवारपासून अधिकच जोर धरला आहे. सोमवारी (ता. १२) पहाटेपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. पावसाने क्षणाचीही उसंत घेतली नसून दुपारी एक वाजल्यानंतर पावसाचा प्रचंड जोर वाढला आहे. दरम्यान दुपारच्यावेळी समुद्राला पौर्णिमेची भरती आल्यामुळे वहिंद्रा खुटखाडी टोकेपाडा खाडी चिखलाखाडीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. वाहनांची वाहतूक देखील धीम्या गतीने सुरू आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88899 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..