निराधार कुटुंबाला शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून मदतीचा हात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निराधार कुटुंबाला शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून मदतीचा हात
निराधार कुटुंबाला शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून मदतीचा हात

निराधार कुटुंबाला शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून मदतीचा हात

sakal_logo
By

उद्धव ठाकरे यांच्याकडून काळे कुटुंबियांचे सांत्वन

खर्डी, ता. १३ (बातमीदार) : शहापूर तालुक्यातील कसाऱ्यातील ज्येष्ठ शिवसैनिक भगवान काळे हे मातोश्री येथे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गेले असता त्यांचा मातोश्रीच्या परिसरातच हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता. याबाबत ‘सकाळ’मध्ये ‘मातोश्रीच्या अंगणातच घेतला अखेरचा श्वास; शहापूरच्या शिवसेना पदाधिकाऱ्याचे निधन’ या मथळ्याखाली ७ जुलै रोजी बातमी प्रसिद्ध झाली होती.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या शिवसेनेच्या दोन्ही गटांनी काळे यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन करून त्यांना आर्थिक मदत केली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वतीने शिवसेनेचे भिवंडी लोकसभेचे संपर्कप्रमुख रूपेश म्हात्रे यांनी भगवान काळे यांच्या कुटुंबाची भेट घेऊन रोख आर्थिक मदत करून सांत्वन केले; तर भगवान काळे यांच्या मुलांशी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दूरध्वनीद्वारे चर्चा करून तुमच्या कुटुंबाला शिवसेना वाऱ्यावर सोडणार नसून तुमचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत करणार असल्याचे या वेळी उद्धव ठाकरे यांनी आश्वासन दिले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88926 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..