महिला संघटक पदाची धुरा अनिता बिर्जें यांच्या खांद्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिला संघटक पदाची धुरा अनिता बिर्जें यांच्या खांद्यावर
महिला संघटक पदाची धुरा अनिता बिर्जें यांच्या खांद्यावर

महिला संघटक पदाची धुरा अनिता बिर्जें यांच्या खांद्यावर

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाला समर्थन देणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर शिवसेनेने कारवाईची बडगा उगारला आहे. अशातच दुसरीकडे शिवसेनेकडून ठाणे-पालघर जिल्ह्यातील शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये जुन्या महिलांना संधी देत ठाण्यातून अनिता बिर्जे आणि माजी महापौर स्मिता इंदुलकर यांच्या खांद्यावरदेखील महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली असून गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या सर्वांनी शिवसेनेचे पदाधिकारी केदार दिघे यांच्यासह शक्तिस्थळावर जाऊन आनंद दिघे यांच्या समाधीचे दर्शन घेतले.

ठाणे महिला जिल्हा संघटक मीनाक्षी शिंदे यांनी शिंदे गटाला समर्थन दिल्याने पक्षाकडून त्यांची हकालपट्टी करण्यात आली. आता त्यांच्या जागी अनिता बिर्जे यांच्यावर विश्वास टाकत त्यांच्या खांद्यावर ठाणे आणि पालघर जिल्ह्यांची संघटक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जाहीर करण्यात आलेल्या यादीत यापूर्वी शिवसेनेत सक्रिय असलेल्या महिलांचा समावेश आहे; मात्र मागील काही वर्षांपासून त्या प्रवाहाच्या बाहेर फेकल्या गेल्या होत्या, परंतु आता मागील काही दिवसांत घडलेल्या राजकीय स्थित्यंतरानंतर याच महिलांच्या खांद्यावर आता शिवसेनेने जबाबदारी टाकली आहे. दरम्यान, या नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांसह केदार दिघे यांनी शक्तिस्थळावर जाऊन आनंद दिघे यांच्या समाधिस्थळाचे दर्शन घेतले. तसेच या सर्वांचा सत्कारदेखील या वेळी करण्यात आला. हा सत्कार खऱ्या अर्थाने धर्मवीरांच्या विचारांचा असून धर्मवीरांनी शिकवलेल्या निष्ठेचादेखील असल्याचे मत या वेळी केदार दिघे यांनी व्यक्त केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88932 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..