खासदाराला ब्लॅकमेल करणाऱ्या दिल्लीतील महिलेविरोधात गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खासदाराला ब्लॅकमेल करणाऱ्या
दिल्लीतील महिलेविरोधात गुन्हा
खासदाराला ब्लॅकमेल करणाऱ्या दिल्लीतील महिलेविरोधात गुन्हा

खासदाराला ब्लॅकमेल करणाऱ्या दिल्लीतील महिलेविरोधात गुन्हा

sakal_logo
By

मुंबई, ता. १३ : मुंबईतील एका खासदाराला ब्लॅकमेल करून ५६ लाख रुपये उकळल्याप्रकरणी नवी दिल्लीतील एका ३३ वर्षीय महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशानुसार साकीनाका पोलिसांनी हा गुन्हा नोंदवला आहे.
पत्नीला घटस्फोट देण्याची मागणी पूर्ण न केल्यास समाज माध्यमावर प्रतिमा डागाळण्याची धमकी या महिलेने दिल्यानंतर खासदाराने १२ मे रोजी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. खासदाराशी आपले संबंध असल्याचा दावा महिलेने केला असून लग्न करण्याची मागणी ती करत होती. पीडित खासदाराने यापूर्वी दुबईच्या शारजा पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. त्यानुसार तिला ७८ दिवसांचा तुरुंगवास भोगावा लागला होता; मात्र तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तिने खासदाराकडे पुन्हा तगादा लावला. अखेर पीडित खासदाराने अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली. त्यानंतर याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88957 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..