कल्‍याणमध्‍ये तब्‍बल १५ तासांनी पाणीपुरवठा पूर्वपदावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्‍याणमध्‍ये तब्‍बल १५ तासांनी पाणीपुरवठा पूर्वपदावर
कल्‍याणमध्‍ये तब्‍बल १५ तासांनी पाणीपुरवठा पूर्वपदावर

कल्‍याणमध्‍ये तब्‍बल १५ तासांनी पाणीपुरवठा पूर्वपदावर

sakal_logo
By

कल्याण, ता. १४ (बातमीदार) : उल्हास नदी आणि काळू नदीकिनारी असलेल्या पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात नदीचे पाणी शिरल्याने कल्याण पूर्व आणि पश्चिमेला पाणीपुरवठा बंद करण्‍यात आला होता. पावसाचा जोर आणि नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी झाल्याने १५ तासांनी पाणीपुरवठा पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.

कल्याण-डोंबिवली शहरी आणि ग्रामीण भागात मागील २४ तासांत १४० मिमि पाऊस पडला असून, १ जूनपासून आजमितीस १,४८९ मिमि पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. १३ जुलै रोजी सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने काळू आणि उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली. काळू नदीच्या किनारी केडीएमसी टिटवाळा आणि उल्हास नदीकिनारी असलेल्या मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शिरल्याने पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याने टिटवाळा, कल्याण पूर्व आणि पश्चिममधील काही भागात पाणी पुरवठा बंद करण्यात आला होता. मध्यरात्री पाणी ओसरल्याने गुरुवारी १४ जुलै रोजी तब्बल १५ तासांनी सकाळी १० वाजल्‍यापासून पाणीपुरवठा पूर्वपदावर करण्यासाठी केडीएमसी पाणीपुरवठा विभागाकडून काम सुरू करण्‍यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88974 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..