गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप
गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप

गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. १४ (बातमीदार) : गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे तसेच रिक्षाचालकांना छत्री आणि रेनकोटचे वाटप करत अंबरनाथ शिवसेना शहर शाखा आणि शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या वतीने अनोख्या रीतीने गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. गुरुपौर्णिमेनिमित्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला शहरप्रमुख वाळेकर यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली.
छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवसेनेच्या शहर शाखेत छत्री, रेनकोट, शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला भरपावसातही नागरिकांच्या लांबवर रांगा लागल्या होत्या. सुमारे चार हजार विविध वस्तूंचे गरजूंना वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना वह्या, पेन्सिल, पट्टीपासून खोडरबर, पाण्याची बाटली या शालोपयोगी वस्तू देण्यात आल्या. शहरप्रमुख वाळेकर, माजी नगराध्यक्ष विजय पवार, माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर, नीता परदेशी, मालती पवार, पद्माकर दिघे, स्वप्नील जावीर, प्रकाश डावरे, अरविंद मालुसरे, मिलिंद गान यांच्यासह शिवसेनेचे माजी नगरसेवक व असंख्य पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88978 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top