
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
वासिंद, ता. १४ (बातमीदार) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत सेवाभावी संस्थांतर्फे यावर्षीही सरस्वती विद्यालयात दहावीच्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व बॅकिंग भरती तसेच पोलिस भरतीपूर्व परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तकांचे वाटप करण्यात आले. गुरुपौर्णिमेनिमित्त वासिंद येथील सरस्वती विद्यालयात झालेल्या या कार्यक्रमात शिक्षणप्रेमी भास्कर भोईर यांच्यातर्फे ४० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यवाटप करण्यात आले. श्रीराम मित्र मंडळ अध्यक्ष अनिल मानिवडे व संचालकांतर्फे सरस्वती विद्यालयासह परिसरातील आठ शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. तसेच, गुरुपौर्णिमेनिमित्त शिक्षकांनाही सन्मानित करण्यात आले. सरस्वती विद्यालयात झालेल्या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल भेरे व संचालक मंडळाचे सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88981 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..