घणसोलीतील मंदिरातील देव चोरीला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घणसोलीतील मंदिरातील देव चोरीला
घणसोलीतील मंदिरातील देव चोरीला

घणसोलीतील मंदिरातील देव चोरीला

sakal_logo
By

घणसोली, ता. १४ (बातमीदार) : घणसोलीतील रानकर आळी येथील मंदिरातले देव चोरीला गेले असल्याची घटना बुधवारी (ता. १३) दुपारी घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून स्थानिकांनी रबाळे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

घणसोली रानकर वाडी येथील कुलदैवत खंडोबा मंदिरात खंडोबाची मूर्ती आणि इतर पाच देवांच्या चांदीच्या मूर्ती होत्या. बुधवारी दुपारी दर्शनासाठी आलेला एक अज्ञात तरुण मंदिराबाहेर काही वेळ बसला होता. काही वेळानंतर मंदिरात कुणी नसल्याचा फायदा घेत मंदिरातील मूर्ती चोरी करून पळ काढला. हा सर्व प्रकार मंदिराच्या बाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. मंदिरात दर्शनासाठी एक भाविक गेला असता त्याला तिथे देवाच्या मूर्ती आढळून न आल्याने शोधाशोध घेण्यास सुरुवात झाली. यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरीचा प्रकार उघडकीस आला. ग्रामस्थांनी या प्रकरणी रबाळे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या आधीही घणसोली गाव परिसरात चोरीच्या घटना घडल्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89001 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..