वरिष्ठ निवासी डॅाक्टरांची फरपट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वरिष्ठ निवासी डॅाक्टरांची फरपट
वरिष्ठ निवासी डॅाक्टरांची फरपट

वरिष्ठ निवासी डॅाक्टरांची फरपट

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : आठवड्यापूर्वी एमडी-एमएस परीक्षांचा निकाल लागलेला असताना वरिष्ठ निवासी डॉक्टरांना अनुभव प्रमाणपत्र व त्या काळातील विद्यावेतन देण्याची प्रक्रिया रखडलेली आहे. याबाबत वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या संघटनेकडून वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाकडे पाठपुरावा केला जात आहे; मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने वरिष्ठ निवासी डॉक्टरांमध्ये फसगत झाल्याची भावना निर्माण झाली आहे.
वैद्यकीय सेवा देण्यासाठी सरकारकडे डॉक्टरांची कमतरता असल्यामुळे एक वर्षाचा बाँड करून घेण्यात येतो; मात्र सेवेत सामावून घेण्यासाठीच उशीर होत असल्याने १२ महिन्यांचा बाँड १४ महिन्यांवर जातो. या काळात डॉक्टरांकडून बिनपगारी काम करून घेतले जात आहे. तसेच वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने कोणत्याही प्रकारचे निर्देश दिले नसल्यामुळे विविध वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सेवा केलेल्या निवासी डॉक्टरांच्या कालावधीत प्रचंड तफावत आहे. नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १६० दिवस, यवतमाळ येथे १२० दिवस, आंबेजागाई येथे ९० दिवस, मुंबईतील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ४० ते ६० दिवसांच्या कालावधीचे अनुभव प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. त्यातही काही ठिकाणी वरिष्ठ निवासी व काही ठिकाणी केवळ बाँड प्रमाणपत्र दिल्याने गोंधळ वाढला असल्याने महाराष्ट्र असोसिएशन ऑफ बॉण्डेड सिनियर रेसिडंट डॉक्टर्स असोसिएशनने वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाकडे त्वरित निर्देश निर्गमित करण्याची मागणी पत्रातून केली आहे. शिवाय, कोविड काळामध्ये सेवा दिलेल्या निवासी डॉक्टरांना एक लाख २१ हजार रुपये ऋणनिर्देश निधी जाहीर झाला असताना सरकारच्या जीआरमधील चुकीमुळे या निधीपासून डॉक्टरांना वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागाने ही चूक दुरुस्त करून तयार केलेल्या प्रस्तावाला मान्यता द्यावी, अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे.

कोट
सध्याच्या परिस्थितीत वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या जागा उपलब्ध नाहीत. कोविडच्या दुसऱ्या लाटेत डॉक्टरांची कमतरता असल्याने परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या. ज्या डॉक्टरांनी कोविड काळात सेवा पुरवल्या त्यांचे सहा महिन्यांचे नुकसान झाले; मात्र डॉक्टरांच्या हक्काची सवलत वा सूट प्रशासनाने दिली नसल्याचे वरिष्ठ निवासी डॉक्टरांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
- डॉ. दीपक मुंढे, अध्यक्ष, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ बाँण्डेड सिनियर रेसिडंट डॉक्टर्स.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89015 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..