वसईत भरपावसात जलसंकट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसईत भरपावसात जलसंकट
वसईत भरपावसात जलसंकट

वसईत भरपावसात जलसंकट

sakal_logo
By

वसई, ता. १४ (बातमीदार) : गेल्या आठवडाभरापासून कोसळणाऱ्या पावसामुळे पालघर जिल्हा जलमय झाला असताना, वसई-विरारमध्ये मात्र भरपावसातच जलसंकट ओढवले आहे. पालिका हद्दीला पाणीपुरवठा होणाऱ्या मासवण व धुकटन उपसा केंद्राचा (पम्पिंग स्टेशन) वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. यातील नेमका बिघाड काय, याचा वीज अभियंत्यांनाअद्याप थांगपत्ताच न लागल्याने शहरांचा पाणीपुरवठा खंडित राहणार आहे. पुढील तीन दिवस ही स्थिती कायम राहणार असल्याने नागरिकांनी पिण्याचे पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिका पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना केले आहे.
वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणारे धामणी-सूर्या धरण सध्या ८० टक्के भरले आहे; तर पेल्हार धरण ८३ टक्के व उसगाव धरण ७३ टक्के भरले आहे. शहराला सर्वाधिक पाणीपुरवठा हा सूर्या धामणी धरणातून होतो. सूर्या टप्पा १ व ३ या योजनेतून सर्वाधिक २०० दशलक्ष लिटर पाणी प्रतिदिन शहराला उपलब्ध होते. या योजनेतील मासवण व धुकटन उपसा केंद्रामधील वीजपुरवठा यापूर्वी वारंवार खंडित होत होता. गुरुवारी (ता. १४) तो पूर्णतः खंडित झाल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे.
पावसाचा जोर कायम असल्याने सूर्या धामणी धरणाचे नियोजन बिघडून तांत्रिक अडचणी येत आहेत. मासवण व धुकटण या ठिकाणी महावितरणचे अधिकारी तसेच महापालिका अभियंते यांनी भेट देऊन कामाचा आढावा घेतला. महावितरणकडून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असले, तरी सोसाट्याचा वारा व पावसामुळे अडचणी येत आहेत. त्यातच बिघाड नेमका काय, याचा शोध लागला नाही. जरी वीजपुरवठा सुरळीत झाला, तरी सूर्या योजनेतून शहरास मिळणारे पाणी कमी दाबाने येणार आहे. त्यामुळे मुबलक पाणी असतानाही नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

पाणी उपसा केंद्रातील वीजपुरवठा गेल्या तीन दिवसांपासून वारंवार खंडित होत होता. सद्यस्थिती वीजपुरवठा पूर्णतः बंद झाल्याने मासवण व धुकटन उपसा केंद्र बंद आहे. वीज अभियंत्यांशी संपर्कात असून लवकरच वीजपुरवठा सुरळीत होईल.
- अनिलकुमार पवार, आयुक्त, वसई-विरार महापालिका

पाणीसाठा दशलक्ष घन मीटरमध्ये
धरण क्षमता उपलब्ध साठा टक्केवारी
धामणी २७६.३५ २२१.५० ८०
उसगाव ४.९६ ३.६२३ ७३.०४
पेल्हार ३.५६ २.९६९ ८३.४०

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89016 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..