
कळव्यातील जानकीनगर येथे घरांमध्ये पाणी
कळवा, ता. १४ (बातमीदार) : कळवा खाडीनजीक असलेल्या जानकी नगरमध्ये बुधवारी (ता. १३) रात्री सुरू झालेल्या मुसळधार पावसाने व गुरुवारी सकाळी खाडीला आलेल्या भरतीच्या पाण्याने येथील मयुरेश चाळीत पाणी भरले आहे. चाळीच्या प्रत्येक घरात गुडघाभर पाणी साचले असून येथील रहिवाशांनी साठवून ठेवलेले महिनाभराचे अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू व फर्निचर भिजून खराब झाले आहे.
या परिसरात कळव्यातील भूमाफियांनी खाडीच्या किनाऱ्यावर डेब्रिजचा भराव टाकून नव्या कच्च्या बेकायदा झोपड्या बांधल्या आहेत. तसेच वाहत येणाऱ्या नैसर्गिक नाल्यांच्या प्रवाहावर भरणी करून ते अडवल्याने भरतीचे पाणी अडते व हे पाणी येथे असलेल्या जुन्या चाळीमध्ये शिरते. त्यामुळे येथील नागरिकांना प्रत्येक वर्षी पुराच्या पाण्याचा व या पुरामुळे येणाऱ्या भरतीच्या पाण्याचा सामना करावा लागतो. या कारणाने दर वर्षी त्यांचे नुकसान होत असते. बुधवारी रात्री येथे असाच प्रकार घडल्याने नागरिकांनी रात्र जागून काढल्याचे सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89023 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..