आणीबाणीतील बंदिवासांना राज्य सरकारकडून न्याय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आणीबाणीतील बंदिवासांना राज्य सरकारकडून न्याय
आणीबाणीतील बंदिवासांना राज्य सरकारकडून न्याय

आणीबाणीतील बंदिवासांना राज्य सरकारकडून न्याय

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा,
ठाणे, ता. १४ : आणीबाणीच्या कालावधीत बंदिवास भोगलेल्या व्यक्तींचा यथोचित गौरव करण्याची योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल भाजपचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. बंदिवानांना पुन्हा मानधन सुरू करण्यासाठी आमदार डावखरे यांनी ५ जुलै रोजी पत्र पाठविले होते. त्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाल्यामुळे आणीबाणीतील बंदिवासांसाठी आज खऱ्या अर्थाने न्यायाचा दिवस आहे, अशी प्रतिक्रिया आमदार डावखरे यांनी व्यक्त केली आहे.
भारतीय लोकशाहीवर १९७५ मध्ये आलेल्या आणीबाणीरुपी संकटावेळी लढा देणाऱ्या नागरिकांचा कायम सन्मान व्हावा, या दृष्टीकोनातून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत जुलै २०१८ मध्ये आणीबाणीतील बंदीवानांना पेन्शन योजनेची अंमलबजावणी सुरू केली होती. मात्र, महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर आल्यानंतर सहा महिन्यांतच ही योजना बंद केली होती. हा निर्णय अत्यंत दुर्दैवी, लोकशाही कायम ठेवण्यासाठी लढा देणाऱ्या नागरिकांचा अपमान करणारा होता, असे नमूद करून आमदार निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ५ जुलै रोजी पत्र पाठविले होते. त्यात लोकशाहीसाठी लढा देणाऱ्या नागरिकांचा सन्मान करण्याच्या दृष्टीकोनातून आणीबाणीविरोधातील आंदोलनात सहभागी व्यक्तींचा सन्मान करण्याचे धोरण पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार हा निर्णय झाल्यामुळे आमदार डावखरे यांनी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
...............
लोकतांत्रिक सेनानी संघाकडून निरंजन डावखरे यांचे आभार
आणीबाणीतील बंदीवानांना पेन्शन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल लोकतांत्रिक सेनानी संघाचे प्रवक्ते अनिल भदे यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांबरोबरच आमदार निरंजन डावखरे यांचे आभार मानले आहेत. नव्या राज्य सरकारचा निर्णय अभिनंदनीय असून, लोकशाहीची बूज राखणारा आहे. या महत्वपूर्ण विषयाचा पाठपुरावा आमदार निरंजन डावखरे यांनी सुरुवातीपासून केला होता. त्यांच्या प्रयत्नाला यश आल्याचे अनिल भदे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89026 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top