मुरबाड रेल्वेचे काम अडीच वर्षात पूर्ण होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुरबाड रेल्वेचे काम अडीच वर्षात पूर्ण होणार
मुरबाड रेल्वेचे काम अडीच वर्षात पूर्ण होणार

मुरबाड रेल्वेचे काम अडीच वर्षात पूर्ण होणार

sakal_logo
By

मुरबाड, ता. १४ (बातमीदार) ः गेल्या अडीच वर्षांत महविकास आघाडी सरकारच्या काळात रखडलेल्या मुरबाड रेल्वेचे काम पुढील अडीच वर्षांत पूर्ण होणार असल्याची माहिती केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मुरबाड येथे पत्रकारांशी व्हिडीओ प्रेस कॉन्फरन्सवरून बोलताना दिली.

मुरबाड येथे रेल्वे आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पन्नास टक्के खर्चाचा वाटा उचलला आहे; मात्र पूर्वीच्या सरकारने रेल्वेला पाठवलेल्या पत्रात हे रेल्वेचे काम कोणत्या कंत्रादारांकडून केले जाणार आहे ते कळवण्याची अट घातली होती. त्यामुळे हे काम पुढे जात नव्हते. आताच्या सरकारने ही अट काढून मुरबाड रेल्वेसाठी ५० टक्के वाटा उचलण्याची तयारी दाखवल्याने आता रेल्वेचा मार्ग मोकळा झाला आहे असे ते म्हणाले. याबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी बोलणे झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आंबिवली, आपटी, मामनोली, पोटगाव व मुरबाड असा हा रेल्वे मार्ग असणार आहे. पुढील टप्प्यात हा मार्ग माळशेज घाटपर्यंत वाढवण्याचे प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89034 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..