उरण तालुक्यात स्वच्छता पंधरवडा साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उरण तालुक्यात स्वच्छता पंधरवडा साजरा
उरण तालुक्यात स्वच्छता पंधरवडा साजरा

उरण तालुक्यात स्वच्छता पंधरवडा साजरा

sakal_logo
By

उरण (वार्ताहर) : भारत पेट्रोलियम कंपनीच्या एम.यू.पी.एल. पाईपलाईन विभागाच्या वतीने फुंडे येथील रयत शिक्षण संस्थेची शाळा आणि जिल्हा परिषद शाळा, फुंडे गाव, उरण परिसरातील गाव पाड्यांमध्ये स्वच्छता पंधरवडा उपक्रम राबविण्यात आला. या वेळी कंपनीचे अधिकारी संदीप टाकले, मंगेश जाधव, रवींद्र कटकदौंड, हर्षल भाजीपाले, सरपंच, ग्रामसेवक यांच्यासह शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी प्रभातफेरी काढण्यात आली असून विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच चित्रकला, निबंध स्पर्धेचे आयोजन केले. या कार्यक्रमप्रसंगी जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत, पोलिस ठाणे येथे कचराकुंडी, झाडू तसेच सॅनिटायझेशन किटचे वाटप करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89042 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top