
ठाण्यात ८१ मिमी पाऊस
ठाणे, ता. १४ ः अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला जात असताना, हवामान खात्याचा अंदाज कुठे तरी चुकताना दिसून आला आहे. ठाणे शहरात गेल्या चोवीस तासात ८१.९६ मिमी पाऊस पडला; तर गुरुवारी ८.३० पासून दुपारी ३.३० वाजेपर्यंत ३२.२४ मिमी एवढ्याच पावसाची नोंद झाली. ठाण्यात गुरुवारी सकाळपासून दुपारपर्यंत ९ झाडे कोसळली असून तीन ठिकाणी पाणी साचले होते; तर एका ठिकाणी संरक्षण भिंतीला तडे गेले आहेत.
मुंबईला ऑरेंज आणि पालघरला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या चोवीस तासात म्हणजे बुधवारी सकाळी ८.३० ते गुरुवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत ठाणे शहरात ८१.९६ मिमी पाऊस झाला. याचदरम्यान ६६ तक्रारी आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामध्ये ३२ तक्रारी झाडे उन्मळून पडल्याचा आहेत. शहरात गुरुवारी सकाळपासून संततधार पाऊस सुरू आहे. दुपारी साडेतीनपर्यंत ३२.२४ मिमी पाऊस झाला असून दुपारी साडेअकरा ते दीड वाजेपर्यंत २४.९० मिमी झाला आहे. या पावसामुळे कोलशेत तरीचा पाडा, वंदना एसटी डेपोजवळ आणि तीन पेट्रोल पंप येथे पाणी साचले होते; तर ९ ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहे. यामध्ये ठाणे न्यायालयाच्या आवारात, माजी नगरसेवक हिरा पाटील यांच्या घरावरती झाड पडले आहे. कोपरी स्मशानभूमीत झाड पडले आहे. दरम्यान वागळे इस्टेट रोड क्रमांक २२ येथील पालिका उद्यानाची संरक्षण भिंतीला तडे गेले आहेत. तर पहाटे मुंब्र्यात एका घराच्या भिंतीचा काही भाग पडल्याने महिला जखमी झाली असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89054 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..