अतिवृष्टीमुळे शाळांना दिलेल्या सुट्ट्यांवरून संभ्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अतिवृष्टीमुळे शाळांना दिलेल्या सुट्ट्यांवरून संभ्रम
अतिवृष्टीमुळे शाळांना दिलेल्या सुट्ट्यांवरून संभ्रम

अतिवृष्टीमुळे शाळांना दिलेल्या सुट्ट्यांवरून संभ्रम

sakal_logo
By

ठाणे, ता. १४ : जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे शाळांना दोन दिवस सुट्टी देण्याचा निर्णय ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी बुधवारी रात्री उशिरा जाहीर केला, परंतु रात्री उशिरा निर्णय झाल्यामुळे शाळा व्यवस्थापकांना हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता आला नाही. त्यामुळे अनेक शाळांमध्ये गुरुवारी सकाळच्या सत्रातील विद्यार्थ्यांना शिक्षकांनी पुन्हा घरी पाठवल्याचे चित्र दिसून आले.

जिल्ह्यात बुधवारी पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी पाणी साचण्याच्या घटना समोर येत आहेत. तसेच उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे येत्या दोन दिवसांत असाच मुसळधार पाऊस झाला तर बदलापूर आणि आसपासच्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टनकोनातून ठाणे जिल्हा प्रशासनाने बुधवारी रात्री उशिरा गुरुवार आणि शुक्रवारी इयत्ता बारावीपर्यंतच्या शाळांना सुट्टी जाहीर केली, परंतु हा निर्णय उशिरा झाल्यामुळे अनेक शाळा व्यवस्थापकांना याविषयी माहिती मिळाली नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेला सुट्टी असल्याचा संदेश मिळाला नाही, तर या निर्णयाबाबत अनेक शाळा व्यवस्थापकांमध्ये संभ्रम असल्याचेही दिसून आले. पालिका हद्दीतल्या शाळांना स्थानिक प्रशासनाकडून कोणतेही आदेश न आल्याने अनेकांनी गुरुवारी वर्ग सुरू ठेवले होते. इतर काही शाळांमध्ये सकाळच्या सत्रातील विद्यार्थी आले होते, परंतु या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी पुन्हा घरी पाठवले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89059 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..