माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यावर ईसीआयआर दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यावर ईसीआयआर दाखल
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यावर ईसीआयआर दाखल

माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यावर ईसीआयआर दाखल

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्यावर २००९ ते २०१७ दरम्यान काही नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच एनएसईच्या कर्मचाऱ्यांच्या कथित फोन टॅपिंगशी संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींनुसार हा गुन्हा दाखल केला आहे. ईडीने ५ जुलै रोजी पांडे यांची २०१८ सालच्या एका प्रकरणासंदर्भात चौकशी केली होती. सध्या ईडीने दाखल केलेला ईसीआयआर हा संजय पांडे यांच्याशी संबंधित कंपनी आयसॅक सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड आणि इतरांविरुद्ध अलीकडेच सीबीआयने नोंदवलेल्या गुन्ह्यावर आधारित आहे. सीबीआयने नोंदवलेला गुन्हा हा गृह मंत्रालयाच्या तक्रारीवर आधारित आहे.

एनएसईच्या सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात आरोपींमध्ये चित्रा रामकृष्ण, नारायण, रवी वाराणसी, एनएसईचे तत्कालीन कार्यकारी उपाध्यक्ष महेश हल्दीपूर यांचा समावेश आहे. सीबीआयने संजय पांडे, आयसेक सिक्युरिटीजचे संचालक संतोष पांडे (संजय पांडेंची आई), आनंद नारायण, अरमान पांडे (संजय पांडेंचा मुलगा), मनीष मित्तल आणि कंपनीचे कर्मचारी अरुण कुमार सिंग यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने शुक्रवारी या प्रकरणाच्या संदर्भात पांडे, एनएसईचे माजी सीईओ चित्रा रामकृष्ण आणि रवी नारायण यांच्यासह इतरांच्या घरांवर छापे टाकले होते. मुंबई, पुणे, दिल्ली एनसीआर, लखनौ, कोटा आणि चंडीगडमध्ये १८ ठिकाणी छापे टाकण्यात आले.
-----------
बेकायदा फोन टॅपिंग
२००९ ते २०१७ या कालावधीत एनएसई आणि इतर काही कंपन्यांच्या सुरक्षा ऑडिट करणाऱ्‍या आयसॅक सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेडद्वारे एनएसई कर्मचाऱ्यांचे फोन बेकायदा टॅप केल्याचा आरोप आहे. अनियमितता झाल्याच्या आरोपामुळे कंपनीने हे ऑडिट केले होते.
-----
संजय पांडे यांचा संबंध काय?
आयसॅक सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची स्थापना संजय पांडे यांनी मार्च २००१ मध्ये केली आणि मे २००६ मध्ये त्यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला. यानंतर कंपनीचा कारभार त्यांच्या मुलाने आणि आईने हाती घेतला. संजय पांडे यांनी शासकीय सेवेचा राजीनामा दिल्यानंतर कंपनीची स्थापना केली होती. मात्र, त्यांचा राजीनामा राज्य सरकारने स्वीकारला नाही आणि ते पुन्हा सेवेत रुजू झाले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मविआ सरकारच्या काळात पांडे हे मुंबईचे पोलिस आयुक्त होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89063 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top