२०० आमदारांचे द्रौपदी मुर्मूंना मतदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

२०० आमदारांचे
द्रौपदी मुर्मूंना मतदान
२०० आमदारांचे द्रौपदी मुर्मूंना मतदान

२०० आमदारांचे द्रौपदी मुर्मूंना मतदान

sakal_logo
By

मुंबई, ता. १४ ः महाराष्ट्रातील २०० आमदार राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना मते देतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले. महाराष्ट्रातील आमदार-खासदारांच्या बैठकीत भाजप आणि शिंदे गटाच्या सदस्यांना स्वत: द्रौपदी मुर्मू यांनी संबोधित केले. या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियूष गोयल तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या वेळी उपस्थित होते.
राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार मुर्मू आज गोव्याहून मुंबईत पोहोचल्या. भाजपचे महासचिव विनोद तावडे त्यांच्यासमवेत होते. भारताची सेवा करण्याची संधी मला यानिमित्त मिळाली आहे. सर्वोच्च पदावर पोहोचण्याची संधी मिळेल, असे कधीही वाटले नव्हते. हा माझा सन्मान आहे, असे मुर्मू या वेळी म्हणाल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89079 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top