
अथॅलेटिक घडविण्यासाठी रिलायन्सचा पुढाकार
मुंबई, ता. १४ ः देशात ऑलिंपिक दर्जाचे क्रीडापटू घडावेत यासाठी गुरुवारी रिलायन्स इंडस्ट्रीज लि. व अथॅलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने दीर्घकालीन भागीदारीची घोषणा केली. क्रीडा प्रकार वाढीस लागावेत व त्यातून क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी हा करार करण्यात आला आहे.
देशात अथॅलेटिक घडवण्यासाठी रिलायन्स फाऊंडेशन यापूर्वीच फेडरेशनबरोबर प्रयत्न करीत आहेत. आता रिलायन्स इंडस्ट्रीज व फेडरेशन यांच्या भागीदारीमुळे हे प्रयत्न आणखीन गतिमान होणार आहेत. देशातील गुणी क्रीडापट्टूंना हेरून त्यांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी अत्याधुनिक सोयी-सुविधा, शास्त्रशुद्ध सराव, फिजिओथेरपी व अन्य वैद्यकीय साह्य, आहार इ. दिले जाईल. ओदिशा रिलायन्स फाऊंडेशन अथॅलेटिक्स हाय परफॉर्मन्स सेंटर व सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालय या संस्थांचे याकामी साह्य घेतले जाईल. रिलायन्स ग्रुपच्या ध्येयधोरणांनुसार या क्रीडा भागीदारीत मुलींवरही विशेष लक्ष दिले जाईल. महिलांना मानाचे स्थान मिळवून देऊन मुलींना स्वप्ने साकारण्यास याद्वारे मदत केली जाईल. फेडरेशनचे भागीदार म्हणून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तसेच प्रशिक्षण शिबिरांमध्ये राष्ट्रीय टीमची जर्सी, ट्रेनिंग किट यांच्यावर रिलायन्सचा ब्रँड राहील.
कोट
अथॅलेटिक हा जगातील सर्वांत लोकप्रिय क्रीडाप्रकार आहे. या भागीदारीमुळे देशातील विशेषतः गुणी महिला खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सोयी मिळून क्रीडा क्षेत्राचा विकास होईल. यामुळे भविष्यात आपले खेळाडू ऑलिंपिक व जागतिक क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदकांची लयलूट करतील.
- नीता अंबानी, संचालक, रिलायन्स इंडस्ट्रीज
रिलायन्स फाऊंडेशनने २०१७ पासून सर्वोत्तम अथॅलेटिक घडवण्यासाठी रिलायन्स फाऊंडेशन यूथ स्पोर्टस् प्रोग्राममार्फत प्रयत्न सुरू आहेत. देशातल्या पन्नासहून जास्त जिल्ह्यांमधील साडेपाच हजार शिक्षण संस्थांमधून प्रयत्न सुरू केले आहेत.
- आदिल सुमारीवाला, फेडरेशन अध्यक्ष, माजी धावपटू
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89080 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..