पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत
पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत

पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत

sakal_logo
By

बोर्डी, ता. १५ (बातमीदार) ः शुक्रवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. यामुळे परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले आहे. उंबरगाव येथून तलासरीकडे जाणाऱ्या मार्गावरील झरी खाडीपुलावर पाणी आल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प पडली.

दापचेर येथील कुर्झे धरणातील पाणी सोडल्याने नदीला महापूर आला. झरी खाडीपुलावर याचे पाणी आल्यामुळे तलासरी मुंबई महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्याची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे परिसरातील कामगारांना उंबरगाव औद्योगिक वसाहतीत कामाला जाणेदेखील शक्य झाले नाही. मागच्या आठ दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसाने वारंवार वाहतूक ठप्प पडत आहे. तसेच, दैनंदिन रोजगारावर उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबावर बेरोजगारीची पाळी आली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89097 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top