मुसळधार पावसामुळे जीर्ण इमारतीचा भाग कोसळला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुसळधार पावसामुळे जीर्ण इमारतीचा भाग कोसळला
मुसळधार पावसामुळे जीर्ण इमारतीचा भाग कोसळला

मुसळधार पावसामुळे जीर्ण इमारतीचा भाग कोसळला

sakal_logo
By

वाडा, ता. १५ (बातमीदार) ः वाडा शहरातील भानुशाली आळीतील एका जीर्ण इमारतीचा काही भाग मुसळधार पावसामुळे आज (ता. १५) सकाळच्या सुमारास कोसळला. मात्र या इमारतीत कोणीही राहत नसल्याने कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही.

भानुशाली आळी येथील ही इमारत जीर्ण झाली होती. नगरपंचायतीने तिला धोकादायक म्हणून जाहीर करून इमारतीच्या मालकाला इमारत पाडण्याचे आदेश दिले होते. इमारत जीर्ण असल्याने या इमारतीत कोणीही राहत नव्हते; पण इमारत रस्त्याच्या कडेलाच असल्याने पादचाऱ्यांना किंवा खेळणाऱ्या लहान मुलांना याचा धोका होता; पण इमारत कोसळली तेव्हा इथे कोणीही उपस्थित नव्हते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89098 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..