धामणी धरणाचे पाच दरवाजे उघडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धामणी धरणाचे पाच दरवाजे उघडले
धामणी धरणाचे पाच दरवाजे उघडले

धामणी धरणाचे पाच दरवाजे उघडले

sakal_logo
By

कासा, ता. १५ (बातमीदार) ः पालघर जिल्ह्यातील महत्त्वाचे मोठे धरण असणारे धामणी १४ जून रोजी १०० टक्के भरले होते. आता धरणाचे पाचही दरवाजे १०० सेंटीमीटरने उघडले असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत केला जात आहे. धामणी व कवडास या दोन्ही धरणांचा मिळून ४८,३३० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत होत आहे. त्यामुळे प्रशासनातर्फे सूर्या नदीकिनारी असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

धामणी धरणाची एकूण पाणीपातळी ११८.६० मीटर असून २७३.७५९ द.ल.घ.मी. पाणीसाठा उपलब्ध आहे. सध्या धामणी धरणाची पाणी पातळी ११४.४० मीटर; तर २२१.५० द.ल.घ.मी. पाणीसाठा आहे. हे धरण १०० टक्के भरले आहे. धामणीतून १२९०० क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे; तर कवडास धरण ६६.९० मीटर असून यात पाणीसाठा ९.९६० द.ल.घ.मी. आहे. तेसुद्धा १०० टक्के भरले आहे. त्यामुळे पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सूर्या नदीकाठच्या वेती, वरोती, वाघाडी, कासा, चारोटी, घोळ, पेठ, म्हसाड, नानिवली, आंबेदे या गावांना व आजूबाजूच्या पाड्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89104 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top