
मुंबईतून १४ लाखांची इ सिगारेट हस्तगत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : पोलिसांनी केलेल्या कारवाईत मुंबईतून १४ लाखांचा ई-सिगारेटचा साठा हस्तगत करण्यात आला आहे. पोलिसांनी १२ ठिकाणी छापे टाकत ही कारवाई केली आहे.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या सी. बी. कंट्रोल कक्षाकडून मुंबईत ई-सिगारेट उत्पादनांची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई केली. पोलिसांनी मिळालेल्या माहितीची खात्री केल्यानंतर १२ वेगवेगळी पथके तयार करण्यात आली.
या पथकांनी पाली नाका, खार, लोखंडवाला अंधेरी, मालाड येथे ११ दुकाने व ऑनलाइन पद्धतीने विक्री करणारे विक्रेते अशा १२ ठिकाणांवर छापा टाकत कारवाई केली. पोलिसांच्या या कारवाईत २०३० इलेक्ट्रॉनिक सिगारेट, हुक्का फ्लेव्हरचे ९६३ बॉक्स, ई-सिगारेटच्या रिफीलींगच्या ५३ बॉटल्स असा १४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत ११ जणांना अटक करण्यात आली असून पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवत पुढील तपास सुरू केला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89139 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..