ई बसचे कंत्राट रद्द करण्याची भाजपची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ई बसचे कंत्राट रद्द करण्याची भाजपची मागणी
ई बसचे कंत्राट रद्द करण्याची भाजपची मागणी

ई बसचे कंत्राट रद्द करण्याची भाजपची मागणी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा 
मुंबई, ता. १६  ः बेस्ट उपक्रमाने नुकतेच ईव्ही ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला २१०० ई बसचे कंत्राट दिले आहे. या कंत्राटाच्या निविदा प्रक्रिया आक्षेपार्ह असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने हस्तक्षेप करत हे कंत्राट रद्द करावे, अशी मागणी भाजपा नेते आमदार अॅड. आशीष शेलार यांनी केली आहे.
नव्या २१०० ई बस खरेदीचे कंत्राट बेस्टने ईव्ही ट्रान्स प्रा.लि. या कंपनीला दिले आहे. या कंत्राटाची निविदा प्रक्रिया चुकीची असल्याची टिप्पणी नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे. त्यानंतरही बेस्टने हे कंत्राट रद्द केलेले नाही. उलट त्याच कंपनीला कंत्राट मिळावे, म्हणून बेस्ट व्यवस्थापन  प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ही बाब गंभीर असून शासनाने तातडीने या प्रकरणी हस्तक्षेप करावा, अशी विनंती आमदार अॅड. आशीष शेलार यांनी केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89148 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..