आदिवासी पाडे सौर दिव्यांनी उजळणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आदिवासी पाडे सौर दिव्यांनी उजळणार
आदिवासी पाडे सौर दिव्यांनी उजळणार

आदिवासी पाडे सौर दिव्यांनी उजळणार

sakal_logo
By

भाईंदर, ता. १६ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिकेच्या हद्दीतील आदिवासी पाडे लवकरच सौर दिव्यांनी उजळणार आहेत. राज्य सरकारने आदिवासी पाड्यांवर सौर दिवे बसविण्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. लवकरच या कामाला सुरुवात केली जाणार आहे.
मिरा–भाईंदर महापालिका हद्दीत २७ छोटे-मोठे आदिवासी पाडे आहेत. यातील काही पाडे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत आहेत. या आदिवासी पाड्यांतील मूळ रहिवाशांना सोयी-सुविधा मिळाव्यात म्हणून याआधी अनेक विकासकामे या आदिवासी पाड्यांवर झाली आहेत. आदिवासी पाड्यांवरील घरात वीज आली असली, तरी पाड्यांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पथदिवे नाहीत. उद्यानाच्या लगत असलेल्या तसेच वन खात्याच्या हद्दीत येणाऱ्या आदिवासी पाड्यांवर दिवे लावण्यासाठी वन विभागाची परवानगी तत्काळ मिळत नाही. अनेक ठिकाणी विजेचे खांब, वीजतारा टाकण्यासाठी अडचणी येतात. परिणामी अनेक ठिकाणी पथदिवे लागलेले नाहीत. त्यामुळे काळोखात जंगली श्वापदांकडून हल्ले होण्याची भीती कायम असते.
या सर्व आदिवासी पाड्यांवर सौर दिवे बसविण्यासाठी निधी देण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्य सरकारकडे केली होती. राज्य सरकारने ही मागणी मान्य करून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील सर्व आदिवासी पाड्यांवर सौर दिवे लावले जातील. आदिवासी पाडे, तेथे जाणारे रस्ते याचे सर्वेक्षण याआधीच झाले आहे. आता निविदा प्रक्रिया पूर्ण करून सौर दिवे बसवण्याचे काम पुढील काही दिवसांत सुरू होईल व दिवाळीपूर्वी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल.
– आमदार प्रताप सरनाईक

गॅसवर चालणाऱ्‍या शवदाहिन्यांसाठीही निधी
स्मशानभूमींमध्ये गॅसवर चालणाऱ्‍या शवदाहिन्या बसविण्यासाठीदेखील राज्य सरकराने पाच कोटी रुपये देऊ केले आहेत. स्मशानभूमीमधील धुराचा त्रास परिसरातील रहिवाशांना होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर स्मशानभूमींमध्ये विद्युत किंवा गॅसवर चालणाऱ्‍या शवदाहिन्या बसविण्यासाठी निधी देण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली होती. ती मान्य करण्यात आली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89164 Txt Palghar Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..