रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे आमदारांचे निर्देश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे आमदारांचे निर्देश
रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे आमदारांचे निर्देश

रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे आमदारांचे निर्देश

sakal_logo
By

वाशी, ता. १६ (बातमीदार) : मान्सूनपूर्व कामांच्या केलेल्या सूचनांची योग्य प्रकारे अंमलबजावणी झाली नसल्याने मुसळधार पावसानंतर नवी मुंबईकरांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना राबवावी, पावसाचे प्रमाण कमी होताच रस्त्यावरील खड्डे तत्काळ बुजवावेत, अशी सूचना आमदार गणेश नाईक यांनी केली.

नवी मुंबईतील विविध प्रलंबित प्रश्न आणि पावसाळ्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमदार गणेश नाईक यांनी शुक्रवारी (ता. १५) महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. या वेळी माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, सुधाकर सोनवणे, माजी सभागृहनेते रवींद्र इथापे, माजी सभापती अनंत सुतार, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत आदी उपस्थित होते. पावसाळ्यापूर्वी झाडांची छाटणी योग्य प्रकारे झाली नसल्याचे निदर्शनास आणून दिले. मुसळधार पावसात कोपरखैरणे, सानपाडा, घणसोली‌, महापे व अन्य भुयारी मार्गांमध्ये पाणी तुंबले. त्यासाठी अधिक क्षमतेचे पंप बसवावेत, अशी सूचना नाईक यांनी केली. केमिकलमिश्रित खडीचा वापर करून रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत. दरड कोसळण्याच्या संभाव्य अपघातांपासून नागरिकांचे संरक्षण करावे आणि महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवावी, असे निर्देश त्यांनी दिले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89189 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..