विक्रमगडमधील खांड, मुँहू खुर्द लघु पाटबंधारे ओव्हर फ्लो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विक्रमगडमधील खांड, मुँहू खुर्द लघु पाटबंधारे ओव्हर फ्लो
विक्रमगडमधील खांड, मुँहू खुर्द लघु पाटबंधारे ओव्हर फ्लो

विक्रमगडमधील खांड, मुँहू खुर्द लघु पाटबंधारे ओव्हर फ्लो

sakal_logo
By

विक्रमगड, ता. १६ (बातमीदार) ः विक्रमगड तालुक्यात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. नद्यांना पूर आल्याने अनेक ठिकाणी पूल आणि मोऱ्यावरून पाणी वाहत होते. त्यामुळे अनेक गावांचा काही काळ संपर्क तुटला होता. तालुक्यातील महत्त्‍वाचे समजले जाणारे खांड लघु पाटबंधारे व मुँहू खुर्द लघु पाटबंधारे एक आठवड्याच्या पावसाने ओव्हर फ्लो झाले आहेत; तर देहर्जा, पिंजाळ या नद्या तुडुंब भरून वाहू लागल्या आहेत. खांड लघु पाटबंधाऱ्याचे व मुँहू खुर्द लघु पाटबंधाऱ्याचे पाणी तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी वापरले जाते. त्यामुळे तालुक्यातील सिंचनाचा वर्षभराचा प्रश्न मिटला असल्‍याचे बोलले जात आहे. दरम्‍यान पावसाचा जोर कायम असल्‍याने भातशेती पाण्याखाली आहे. त्‍यामुळे पीक कुजण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89208 Txt Palghar Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..