तब्बल पंधरा दिवसांनी पाऊसाने घेतली उघडीप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तब्बल पंधरा दिवसांनी पाऊसाने घेतली उघडीप
तब्बल पंधरा दिवसांनी पाऊसाने घेतली उघडीप

तब्बल पंधरा दिवसांनी पाऊसाने घेतली उघडीप

sakal_logo
By

वाडा, ता. १६ (बातमीदार) : जून महिन्यात प्रतीक्षा असलेलेल्या पावसाने निराशा केली होती, परंतु जुलै महिन्याची सुरुवातच अतिमुसळधार पावसाने झाली, ती संततधार कायमच सुरू होती. पावसाने आज शनिवारी विश्रांती घेतल्याने तब्बल १५ दिवसांनी वाडावासीयांना सूर्यदर्शन झाले आहे.
गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू होता; तर वाडा तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. विशेषतः या मुसळधार पावसात शेतकऱ्यांचे फार नुकसान झाले असून संपूर्ण शेती पुराच्या पाण्याखाली जाऊन भातरोपे कुजली आहेत. हातात भातरोप नसल्याने शेती ओस टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. तसेच शेतबांधांना मोठ्या खांडी गेल्या आहेत. याबाबत शासनाने काही उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. तालुक्यातील अनेक गाव-पाड्यांना पुराच्या पाण्याचा वेढा बसला होता. यामध्ये रस्ते, पूल तसेच घरांचे मोठे नुकसान झाले आहे. शासन व लोकप्रतिनिधींनी याची गांभीर्याने दखल घेऊन उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. त्यात तब्बल १५ दिवसांनी काही वेळ वाडावासीयांना सूर्यदर्शन लाभल्याने शेतकरी, व्यापारी व ग्रामस्थ यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89234 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top