एएमपी रेल्वे फाटकाजवळील रस्त्याची दुरवस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एएमपी रेल्वे फाटकाजवळील रस्त्याची दुरवस्था
एएमपी रेल्वे फाटकाजवळील रस्त्याची दुरवस्था

एएमपी रेल्वे फाटकाजवळील रस्त्याची दुरवस्था

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. १६ (बातमीदार) ः अंबरनाथमध्ये बहुतेक सगळे रस्ते सिमेंट काँक्रीटचे झाले; मात्र कानसई भागातून येणाऱ्या एएमपी रेल्वे फाटक ते कल्याण-बदलापूर रस्त्याची अवस्था अतिशय खराब झाली असून त्याकडे संबंधित खात्यांनी डोळेझाक केली आहे.

हुतात्मा चौकात पूर्व आणि पश्चिमेला जाणारा उड्डाणपूल बांधल्यानंतर रेल्वे स्थानक परिसरातील फाटक बंद करण्यात आले. कानसई आणि परिसरातून उल्हासनगर अथवा बदलापूरच्या दिशेने जाण्यासाठी असलेल्या रेल्वे फाटकातून दुचाकी आणि चारचाकी वाहने ये-जा करतात; मात्र एमआयडीसीकडे ताबा असलेल्या रस्त्याची दैनावस्था झाली असून नागरिकांना खड्ड्यांतून वाहने चालवावी लागतात. रस्त्यातून नागरिकांना पायी चालणे अवघड होऊन बसले आहे. त्यात रेल्वे क्रॉसिंग असल्याने फाटक बंद झाल्यावर नागरिकांचा खोळंबा होतो. संबंधित रस्त्याची डागडुजी केल्यास कानसईतील नागरिकांना हुतात्मा चौकातील उड्डाणपुलाकडे जाण्यासाठी लागणारा वेळ वाचेल आणि वाहतूक कोंडीचा त्रास थांबेल. अनेक वर्षांपासून परिसरातील नागरिक याबाबत पाठपुरावा करतात; मात्र ठोस उपाययोजना होत नाही, असे येथील रहिवासी श्रीकांत गुजर म्हणाले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89236 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..