नवी मुंबईतही हर घर तिरंगा उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवी मुंबईतही हर घर तिरंगा उपक्रम
नवी मुंबईतही हर घर तिरंगा उपक्रम

नवी मुंबईतही हर घर तिरंगा उपक्रम

sakal_logo
By

वाशी, ता. १६ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिका परिसरातही हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यात येणार आहे. महापालिका स्तरावर या उपक्रमाचे नियोजन करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्या नियंत्रणाखाली अंमलबजावणी समितीची नेमणूक करण्यात आली आहे.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त देशभरात ९ ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने प्रत्येक नागरिकाच्या घरावर, तसेच सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, खासगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था या ठिकाणी राष्ट्रध्वज फडकाविण्याचे केंद्र व राज्य सरकारकडून सूचित करण्यात आले आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात जास्तीत जास्त ठिकाणी तिरंगा फडकविणे या उपक्रमांतर्गत अपेक्षित आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. या अनुषंगाने ध्वजाची उपलब्धता करून घेण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. ज्या नागरिकांना राष्ट्रध्वज खरेदी करणे शक्य नाही, अशांकरिता विविध संस्था, व्यक्ती, उद्योगसमूह यांच्या माध्यमातून राष्ट्रध्वज उपलब्ध करून घेणे प्रस्तावित आहे.


देशाबद्दल प्रत्येकाच्या मनात असलेला आदर व सन्मान व्यक्त करण्यासाठी हर घर तिरंगा हा उपक्रम असून प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकाने यात सक्रिय सहभागी व्हावे. नागरिकांना घरावर व कार्यालयामध्ये ९ ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत तिरंगा फडकवावा, असे आवाहन पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89243 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..