आत्माराम वाळींजकर काळाच्या पडद्याआड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आत्माराम वाळींजकर काळाच्या पडद्याआड
आत्माराम वाळींजकर काळाच्या पडद्याआड

आत्माराम वाळींजकर काळाच्या पडद्याआड

sakal_logo
By

वसई, ता. १६ (बातमीदार) : युद्धशास्त्र व दलित चळवळीला उभारी देऊन समाजात समानतेचा संदेश देणारे लेखक, युद्धशास्त्र अभ्यासक आत्माराम नारायण वाळिंजकर यांनी ८७ व्या वर्षी (ता. १६) अखेरचा श्वास घेतला. त्यांनी समाजात निर्माण केलेले क्रांतिकारक विचार पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारे आहेत.
वसई तालुक्यातील नालासोपारा येथील ते रहिवासी होते. दि इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स स्टडीज अँड अनॅलिसिस नवी दिल्ली संरक्षण संशोधन संस्थेचे ते सभासद होते. त्यांनी समाजसुधारक म्हणून अविरत काम केले. वाळिंजकरांनी अनेक विषयांवर सखोल संशोधन केले असून भारतीय आरमार या विषयात त्यांचा सखोल अभ्यास होता. त्यांच्या जाण्याने साहित्यातील पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दात स्थायी समितीचे माजी सभापती संदेश जाधव यांनी भावना व्यक्त केली. सामाजिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रांतील मंडळींनी आत्माराम वाळिंजकर यांचे समेळपाडा गाव येथील राहत्या घरी अंत्यदर्शन घेतले.


समाजाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न
----------------------------------------
चर्मकार समाजात जागृतीचे काम सुरू केल्यानंतर दलित चळवळीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या चळवळीत ते विलीन झाले. उत्तर कोकण दलित मुक्ती चळवळ हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले होते. त्यांनी २३ जानेवारी १९६८ रोजी प्रजासत्ताक भारताचे आरमार हा पहिला लेख लिहिला होता. महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. संतांचा भागवतधर्म आणि भारतीय राज्य घटना, २००० साली शस्त्रास्त्रांच्या उत्क्रांतीत रणतंत्राचे बदलते रंग, साने गुरुजी आणि पंढरपूर मंदिर प्रवेश चळवळीचे अध्यात्म, कंपनी सरकार आणि नवयुगक्रांतीचे प्रवर्तक आदी आत्माराम वाळिंजकर यांची पुस्तके प्रकाशित झाली यातून त्यांनी समाजाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89256 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top