या मुलांचे पालक कोण? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

या मुलांचे पालक कोण?
या मुलांचे पालक कोण?

या मुलांचे पालक कोण?

sakal_logo
By

मुंबई, ता. १७ ः श्री मानव सेवा संघ यांनी त्‍यांच्‍याकडे दाखल असलेल्‍या चार मुलांच्‍या पालकांचा शोध सुरू केला आहे. ही मुले पोलिसांनी बाल कल्‍याण समितीच्‍या आदेशाने मानव सेवा संघामध्‍ये दाखल केली आहेत.
यातील रंजना विजय कांबळे ही मुलगी १४ वर्षे वयाची असून ती मानव सेवा संघामध्‍ये गेली पाच वर्षे दाखल आहे. यापूर्वी ती बालिकाश्रम येथे होती. तेथून बाल कल्‍याण समितीच्‍या आदेशाने व नेहरूनगर पोलिस स्‍टेशनमार्फत तिला मानव सेवा संघात दाखल केले आहे. तसेच १० वर्षे वयाची बन्‍नो रमेश ही मुलगी गेले वर्षभर श्री मानव सेवा संघामध्‍ये दाखल आहे. ही मुलगी सीएसएमटी पोलिसांना स्‍टेशनवर तिच्‍या मैत्रिणीसोबत पालकांशिवाय फिरताना आढळून आली होती. तिला पोलिसांनी मानव सेवा संघामध्‍ये दाखल केले आहे. त्‍याचप्रमाणे आठ महिन्‍यांची मुस्‍कान ही सात महिन्‍यांपासून मानव सेवा संघात दाखल आहे. हिचे इब्राहिम नावाच्‍या व्‍यक्‍तीने अपहरण करून तमिळनाडू येथे विकले होते. पोलिसांनी तिचा शोध लावून तिला परत आणले व बाल कल्‍याण समितीच्‍या आदेशाने श्री मानव सेवा संघ येथे दाखल केले. मणीकियम हा दोन वर्षे वयाचा मुलगा परेल रेल्‍वे स्‍टेशन पुलावर मुंबई चाईल्‍ड लाईन यांना आढळून आला होता. त्‍याला दादर रेल्‍वे पोलिसांनी बाल कल्‍याण समितीच्‍या आदेशाने श्री मानव सेवा संघामध्‍ये दाखल केले. या चारही मुलांना अद्याप त्‍यांचे पालक अथवा नातेवाईक भेटण्यास आलेले नाही. यांना जे ओळखत असतील त्‍यांनी श्री मानव सेवा संघ, सायन मेन रोड, सायन (प.) मुंबई २२ दुरध्‍वनी क्रमांक ०२२६२६३६४६५ येथे संपर्क करावा, असे आवाहन श्री मानव सेवा संघातर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89272 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..