
ट्रान्सफार्मरची चोरी झाल्याने पाडे अंधारात
विक्रमगड, ता. १७ (बातमीदार) ः विक्रमगड तालुक्यातील शेवते भडांगेपाडा व ठाकूर पाड्याला वीजपुरवठा करणाऱ्या ट्रान्सफार्मरची १३ जुलै रोजी चोरी झाल्यापासून हे पाडे अंधारात आहेत.
मुसळधार पाऊस व अंधाराचा फायदा घेत या ट्रान्स्फार्मरची चोरी झाल्याचे बोलले जात आहे. भडांगेपाडा व ठाकूर पाड्यात मिळून ७० ते ७५ घरे आहेत. या घरांचा गेल्या तीन ते चार दिवसांपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. या बाबत महावितरण पालघर कार्यालयात गावकरी तक्रार घेऊन गेले होते. त् यावेळी महावितरणच्या विक्रमगड कार्यालयाकडून पोलिस ठाण्यात ट्रान्स्फार्मर चोरीची तक्रार दाखल केल्यानंतर ट्रान्स्फार्मर मिळेल, असे सांगण्यात आल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. मात्र अद्याप ट्रान्स्फार्मर बसविण्यात न आल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
डासांचे प्रमाण वाढले
तालुक्यात गेले काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यात गेल्या तीन दिवसांपासून वीज नसल्याने या पाड्यातील वृद्ध व मुलांचे हाल होत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89273 Txt Palghar Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..