सुरक्षा रक्षकांच्या प्रलंबित वेतनवाढ रखडली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुरक्षा रक्षकांच्या प्रलंबित वेतनवाढ रखडली
सुरक्षा रक्षकांच्या प्रलंबित वेतनवाढ रखडली

सुरक्षा रक्षकांच्या प्रलंबित वेतनवाढ रखडली

sakal_logo
By

कोपरखैरणे, ता. १७ (बातमीदार) : सुरक्षारक्षकांच्या प्रलंबित वेतनवाढीच्या प्रश्नावर तत्कालीन कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंत्रालयात बैठक घेतली होती. त्या वेळी सुरक्षा रक्षकांना वेतनवाढ देण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते; मात्र त्या आदेशाला अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवल्यामुळे अद्यापही सुरक्षारक्षकांच्या वेतनवाढीचा प्रश्न प्रलंबित आहे.

हसन मुश्रीफ कामगार मंत्री असताना एक महिन्याच्या आत सुरक्षारक्षकांच्या पगारवाढीचा प्रलंबित प्रश्न निकाली काढण्याचे आदेश दिले होते. तसेच सर्व सुरक्षा रक्षकांना नामांकित कंपनीचे गणवेश वितरित केले जातील, असे सांगितले होते. तसेच भ्रष्टाचारासंदर्भात रायगड बोर्ड, पुणे बोर्ड यांची चौकशी करण्यासाठी कामगार आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त करण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र मंत्र्यांच्या आदेशाला अधिकारी केराची टोपली दाखवत असल्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे, असून सुरक्षारक्षक संताप व्यक्त करत आहेत.

सुरक्षारक्षकांच्या मागण्या
महागाईवाढ व सुरक्षारक्षकांच्या वेतनात खूप फरक असून तो दूर करण्यात यावा, प्रतीक्षा यादीवरील सुरक्षारक्षकांना पूर्ण वेतन मिळावे, जो सुरक्षारक्षक आस्थापनेतून कमी केला जातो, त्याची सखोल चौकशी होत नाही, तोपर्यंत त्याला पूर्ण वेतन मिळावे; तसेच खासगी सुरक्षारक्षक व मंडळाचे एकत्रीकरण करावे, अशा मागण्या करण्यात येत आहेत.

सुरक्षारक्षकांच्या सर्व मागण्या घेऊन आम्ही वेळोवेळी सरकारकडे पाठपुरावा करत आहोत.
- अशोक डोके, अध्यक्ष, सुरक्षारक्षक मंडळ

सरकारने जर सुरक्षारक्षकांच्या सर्व मागणी मान्य केल्या नाहीत, तर आंदोलन केले जाईल.
- लक्ष्मणराव भोसले, अध्यक्ष,
सुरक्षारक्षक कामगार संघटना

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89285 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top