खड्ड्यांने बेहाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खड्ड्यांने बेहाल
खड्ड्यांने बेहाल

खड्ड्यांने बेहाल

sakal_logo
By

वसई, ता. १७ (बातमीदार) : डहाणू व कासा भागात खड्ड्यांना विविध आकार आले आहेत. काही ठिकाणी गोल गोल, तर अनेक भागात उभ्या खड्ड्यांचे जाळे मार्गावर पसरले असल्याने वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो. एकीकडे रस्त्यांसाठी लाखो रुपये खर्च केले जात असले, तरी नागरिकांचे पैसे मात्र पाण्यात गेले आहेत.
विक्रमगड तालुक्यापासून २० किमी अंतरावर कासा हे गाव आहे. येथे सिमेंट काँक्रीटचे रस्ते उभारले आहेत. दळणवळणासाठी एसटी बसची सुविधा आहे. त्यामुळे बहुतांश नागरिक विद्यार्थी याचा लाभ घेत असतात; परंतु या ठिकाणी पावसाळ्यात मार्गांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे चिखलमय रस्त्यांतून खड्डे सांभाळत मार्ग काढावा लागतो. सुविधांचा अभाव निर्माण झाल्‍यामुळे नागरिकांना खड्ड्यांतून करावा लागणारा प्रवास जिकिरीचा झाला आहे. ज्‍येष्ठ नागरिक, रुग्ण यांसह शालेय विद्यार्थ्यांचे यामुळे मोठे हाल होत आहेत. मार्गावर उभे खड्डे पडल्याने टेम्पोसह अवजड वाहनांना सावधपणे वाहने चालवावी लागतात. रस्‍त्‍यांच्‍या दुरवस्‍थेमुळे दुर्घटना होण्याची शक्यता असून, प्रशासनाने याची वेळीच दखल घेऊन रस्ते दुरुस्त करावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
प्रशासनाने खड्डे बुजवावेत
पालघर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला, तरी ठिकठिकाणी रस्त्यांवर खड्ड्यांची निर्मिती झाली. याचा मोठा फटका कासा गावाला बसला. विद्यार्थ्यांना खांद्यावर दप्तर सांभाळत खड्डे व चिखलमय रस्त्यांतून वाट काढावी लागत आहे. नागरिकांच्या सुरक्षेची काळजी प्रशासनाने घेऊन तत्परता दाखवत खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89300 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..