
दोन लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त
भिवंडी, ता. १७ (बातमीदार) ः वसई महामार्गावरील अंजुरफाटा खारबाव कामण रस्त्यावरून एका टेम्पोमधून विदेशी मद्याची बेकायदा वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त् आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मदन बलाळ यांच्या नेतृत्वाखाली एका विशेष पोलिस पथकाने सापळा रचून सुमारे पावणेतीन लाख रुपये किमतीचा विदेशी मद्यसाठा जप्त केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
भिवंडी–वसई महामार्गावरील अंजुरफाटा खारबाव रस्त्यावर बहात्तर गाळा नारपोली या ठिकाणी असलेल्या हनुमान मंदिराजवळ पोलिसांनी ही कारवाई केली. मंगेश कमलाकर वतारी, जयप्रकाश उत्तम कामत हे दोघे आपल्या टेम्पोतून विदेशी मद्याचा साठा बेकायदा घेऊन येत असल्याची माहिती नारपोली पोलिसांना मिळाली होती. त्यावर पोलिसांनी नारपोली बहात्तर गाळा परिसरात सापळा रचून कारवाई करीत टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये दोन लाख ८० हजार रुपयांचा विदेशी मद्यसाठा आढळून आला. या प्रकरणी नारपोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक मदन बलाळ करीत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89308 Txt Thane Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..