अंधेरीतील पदपथावरील फांद्या हटविल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंधेरीतील पदपथावरील फांद्या हटविल्या
अंधेरीतील पदपथावरील फांद्या हटविल्या

अंधेरीतील पदपथावरील फांद्या हटविल्या

sakal_logo
By

जोगेश्‍वरी, ता. १७ (बातमीदार) ः अंधेरी पूर्वच्‍या शेरेपंजाब सोसायटीच्‍या गुरू नानक इंग्लिश हायस्कूलसमोरील गुरू गोविंद सिंह रस्‍त्‍यावरील पदपथावरील फांद्या अखेर हटविण्यात आल्या आहेत. याबाबत ‘पदपथावरील फांद्या हटवा!’ अशा आशयाचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले होते.
पालिकेच्‍या ‘के’ पूर्व विभागातील शेरेपंजाब सोसायटीच्‍या गुरू नानक इंग्लिश हायस्कूलसमोरील गुरू गोविंद सिंह रस्‍त्‍यावर दोन दिवसांपूर्वी झाडांच्या फांद्या कापून तेथेच ठेवण्यात आल्‍या होत्‍या; तर दुसऱ्या बाजूला पदपथावरील अतिक्रमणांमुळे पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले होते. याबाबतचे वृत्त १७ जुलैला ‘सकाळ’ने प्रसिद्ध झाल्यानंतर पालिका पथकाने तातडीने पथपदावरील फांद्या हटविल्‍या आहेत.
-------
गुरू गोविंद सिंह रस्‍त्‍यावरील फांद्या हटविल्याने पादचाऱ्यांना चालण्‍यासाठी पदपथ मोकळा झाला आहे. झाडांचे मोठे ओडके व येथील अतिक्रमण लवकरच हटवून पदपथ स्‍वच्‍छ करण्यात येणार आहे.
- मनीष वळंजू, सहायुक्‍त आयुक्‍त, मुंबई

छाया ः अंधेरी पूर्वतील गुरू गोविंद सिंह मार्गावरील पदपथ. (सकाळ बातमीचा परिणाम लोगो वापरणे.)

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89314 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..