काळू धरणास होणाऱ्या विरोधाची धार बोथट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काळू धरणास होणाऱ्या विरोधाची धार बोथट
काळू धरणास होणाऱ्या विरोधाची धार बोथट

काळू धरणास होणाऱ्या विरोधाची धार बोथट

sakal_logo
By

मुरबाड, ता. १७ (बातमीदार) ः मुरबाड तालुक्यातील काळू नदीवर धरण बांदण्यात येत आहे. धरणासाठी जमीन संपादित केल्यास आतापर्यंत पडीक असलेल्या जमिनीला चांगला मोबदला मिळेल अशी आशा लोकांना वाटत आहे. त्यामुळे या धरणाला होत असलेल्या विरोधाची धार बोथट होत असल्याचे सांगितले जात आहे.

काळू नदीवरील धरणामुळे मुरबाड तालुक्यातील १८ गावे व २३ पाड्यांची जमीन तसेच वन विभागाची ९९९ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. यामुळे सुमारे ८०० कुटुंबे विस्थापित होणार आहेत. या धरणामुळे शहरी भागात ११४० दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे. हे पाणी ठाणे, कल्याण, उल्हासनगर, भिवंडी निजामपूर महापालिका व अंबरनाथ आणि कुळगाव नगर पालिका यांना दिले जाणार आहे. काळू धरण परिसरातील मुलांना नोकऱ्या मिळतील अशी आशा येथील शेतकऱ्यांना वाटत आहे. यामुळे धरणाला विरोध करायचा की नाही अशा द्विधा मनःस्थितीत लोक आहेत. काळू धरणास स्थानिक लोकांच्या वतीने विरोध करायचा की नाही हे ग्रामस्थांशी चर्चा करून ठरवू, असे श्रमिक मुक्ती संघटनेच्या इंदवी तुळपुळे यांनी सांगितले. तर स्थानिक लोकांबरोबर चर्चा करून काळू धरणाला विरोध करायचा की नाही हे ठरवू, असे स्थानिक संघर्ष समितीचे हरिभाऊ राऊत यांचेही म्हणणे आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89327 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top