
वसई विधानसभा जिल्हाप्रमुखपदी देशमुख
विरार, ता. १७ (बातमीदार) ः वसई विरार महापालिका क्षेत्रात जिल्हा प्रमुख देण्याची अनेक वर्षांची शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची मागणी होती. ती आता एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकारी आमदारांच्या बंडानंतर पूर्ण झाली आहे. पंकज देशमुख यांची वसई विरार महापालिका क्षेत्राचे पहिले विधानसभा जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मिळाला आहे. शिवसेनेच्या मुखपत्रातून हे जाहीर करण्यात आले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार पालघर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून जाहीर करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकातून ही महिती देण्यात आली आहे. २०२० साली पंकज देशमुख यांनी बहुजन विकास आघाडीतून बाहेर पडत शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही त्यांना पदासाठी दोन वर्षे थांबावे लागले होते. पक्षासोबतची बांधिलकी जपत त्यांनी आपले काम सुरू ठेवले होते. शिवसेना संघटनेकरता कार्यक्रम, उपक्रमांचे नियोजन केले होते. याची दखल घेत जुन्या शिवसैनिकांना बाजूला सारत पक्षप्रमुखांनी जिल्हाप्रमुखपदाची माळ पंकज देशमुख यांच्या गळ्यात घातल्याचे बोलले जात आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89328 Txt Palghar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..