खड्डे दुरुस्तीकडे आयुक्तांचे लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खड्डे दुरुस्तीकडे आयुक्तांचे लक्ष
खड्डे दुरुस्तीकडे आयुक्तांचे लक्ष

खड्डे दुरुस्तीकडे आयुक्तांचे लक्ष

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १७ ः मुसळधार पावसामुळे यंदा ठाणे-बेलापूर मार्ग खड्ड्यांच्या विळख्यात सापडला आहे. मार्गावरील नव्याने तयार केलेल्या उड्डाणपुलांवर बहुतांश खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक व प्रवासी हैराण झाले आहेत. अशा खड्ड्यांची पाहणी करून तत्काळ दुरुस्त करण्याचे निर्देश आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले. दरम्यान खड्डे बुजवण्याची जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्यांनी रात्री-बेरात्री मोबाईल फोन बंद ठेवल्यास कारवाई करू, असा इशारा बांगर यांनी दिला आहे.
ठाणे बेलापूर मार्गाची पाहणी करताना विशेषत्वाने उड्डाणपुलाचा पृष्ठभाग उखडला गेल्याचे व त्या ठिकाणी रस्ते दुरुस्तीची कामे सुरु असल्याचे बांगर यांच्या पाहणीमध्ये निर्दशनास आले. या मार्गावर वाहतुकीचा सर्वाधिक ताण असल्याने येथील रस्ता दुरुस्तीची कार्यवाही अधिक काळजी घेत गुणवत्ता राखून करावी असे निर्देशित बांगर यांनी दिले. केलेली डागडुजी पावसाळी कालावधीत टिकतील व पुन्हा लगेच करावी लागणार नाहीत अशा पद्धतीने व्यवस्थितरित्या करावीत असे स्पष्ट निर्देश बांगर यांनी दिले. बेलापूर सेक्टर १५ पासून सुरवात करून सेक्टर ११, आम्र मार्ग, नेरूळ विभागात सेक्टर २५,२७,४६,४८,४२,४०,३८, ज्वेल ऑफ नवी मुंबई जवळील जंक्शन, सेक्टर २८,१०,८,१६,१८, नेरूळ गांव, सारसोळे गाव, नेरूळ स्टेशन, सेक्टर ६ व ४ तसेच जुईनगर सेक्टर २३,२४,२५,११,८, सानपाडा रेल्वे स्टेशन परिसर, सेक्टर ३०, एपीएमसी भाग, तुर्भे गाव, वाशी सेक्टर १४,१५,२८,२९, वाय जंक्शन, ठाणे बेलापूर मार्ग, टी जंक्शन ऐरोली, आंबेडकरनगर, संभाजीनगर, निब्बाण टेकडी त्याचप्रमाणे रबाळेपासून नेरूळ पर्यंत एमआयडीसी क्षेत्र अशा विविध भागांची बांगर यांनी पाहणी केली.

खड्‌डेमुक्‍त रस्‍त्‍याचे उद्दिष्ट
खड्डेमुक्त रस्ते हे आपले उद्दिष्ट असून नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याकरिता आपली यंत्रणा कायम सतर्क असणे व आपत्ती काळात मदतीकरिता तत्पर असणे गरजेचे आहे. अधिकाऱ्यांनी पावसाळी कालावधीत मोबाईल क्रमांक सुरू राहील याची काटेकोर दक्षता घेण्याचे निर्देश बांगर यांनी दिले आहेत.

आपत्ती निवारण कक्षात संपर्काचे आवाहन
नागरिकांनीही पावसाळी कालावधीत कोणत्याही मदतीसाठी महापालिकेच्या आपत्ती निवारण कक्षाशी संपर्क साधावा. महापालिका मुख्यालयातील मध्यवर्ती नियंत्रण कक्षाशी ०२२-२७५६७०६०/६१ या दूरध्वनी क्रमांकावर अथवा १८००२२२३०९/१० या टोल फ्री क्रमांकावर विनामूल्य संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेने केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g89340 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top